लोकमंगलच्या माध्यमातून ३६जोडप्यांच्या जुळल्या रेशीम गाठी

Read Time:2 Minute, 35 Second

रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना……. लगीन घाई सुरू… 36 जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली… या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी… त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला 3७ वा सर्वजातीय सामुदायिक विवाह सोहळ्यात. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही आले होते.

माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 21 नोव्हेंबर रोजी शासनाच्या सर्व अटी आणि नियम पाळत लोकमंगल फौंडेशन विवाह सोहळा साखर कारखाना येथील काडादी मंगल कार्यालयात साध्या पद्धतीने आणि उत्साहात पार पडला. हा सामूहिक विवाह सोहळा विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर होणार होता. पण सोलापुरात सध्या पावसाचे वातावरण असल्याने विवाहस्थळ बदलण्यात आले होते.

या विवाह सोहळ्याचे हे 16 वे वर्ष होते. या विवाह सोहळ्यात 36 वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या. कोरोनाची सर्व नियम पाळून हा विवाह सोहळा पार पडला. आलेल्या र्व­हाडी मंडळींना मास्कचे वाटप करण्यात आले. बैठक व्यवस्थाही सोशल डिस्टन्सच्या पद्धतीने करण्यात आली होती. यंदा मिरवणुकीला परवानगी नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा वधू-वरांची वरात निघाली नाही. लग्नासाठी वधू- आणि वरांकडील 50 मोजक्याच व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. मसाले भात, पोळी भाजी, भजी आणि मोती चूर लाडू असा मेनू होता. जेवणाची व्यवस्था शहाजी पवार आणि त्यांच्या सहर्का­यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 + 8 =