लॉकडाऊन संदर्भात नियमावली जारी; स्थानिक प्रशासनाला अधिकार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधताना १५ जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असेल, असे सांगितले. दरम्यान, रुग्णसंख्येचे दोन भाग करण्यात आले असून, प्रादुर्भाव पाहून सूट द्यायची की, कडक निर्बंध लागू करायचे, याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार प्रादुर्भाव कमी असेल, तर स्थानिक पातळीवर नियम शिथिल होऊ शकतात. दरम्यान, कोरोनाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्हा आणि शहरांत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना मुभा देण्यात आली आहे. तसेच अन्य दुकानांबाबत स्थानिक प्रशासनच निर्णय घेऊ शकते, असेही राज्य सरकारने सांगितले.

रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येनुसार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. मात्र, १५ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असल्याने प्रशासनाला जपूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, कमी रुग्णसंख्या असलेली शहरे आणि जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकतील.
अन्य दुकानांबाबत

स्थानिक पातळीवर निर्णय
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्याचा निर्णय आता मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका आयुक्त वा जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी घेऊ शकतील. केशकर्तनालये, संगणक, पावसाळी वस्तू, कपडे आदी दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार का, याची नागरिकांना अधिक उत्सुकता आहे.

मॉल्सला परवानगी नाही
मॉल्स किंवा व्यापारी संकुले उघडण्यास परवानगी नसेल. अत्यावश्यक सेवेप्रमाणेच अन्य दुकानेही दुपारी २ पर्यंतच उघडी ठेवता येतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील वगळता अन्य दुकाने शनिवारी आणि रविवारी दोन दिवस बंद राहतील.

शेतीशी संबंधित दुकानांना सूट
शेतीचा हंगाम असल्याने दुपारी २ पर्यंत खते, बि-बियाणे, अवजारे आदींची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला वेळेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

धान्य, डाळी, भाजीपाला पुरवठ्यास बंधन नाही
धान्य, डाळी, फळे, भाजीपाला आदींच्या पुरवठ्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही. दुकानांमध्ये कोणत्याही वेळी वस्तूंचा पुरवठा करता येऊ शकतो. फक्त मालाची साठवणूक करण्यासाठी दुपारी २ नंतर दुकाने उघडे ठेवू शकतील. पण त्या काळात ग्राहकांना विक्री करता येणार नाही.

हॉटेलसाठी पार्सल सेवाच
हॉटेलांना आताप्रमाणेच घरपोच सेवेस परवानगी आहे. हॉटेलांमध्ये बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. हे नियम १५ जूनच्या सकाळी सातपर्यंत लागू राहतील.

पुणे, मुंबई, ठाण्यासह १० शहरांत सवलती?
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांची स्वंतत्र प्रशासकीय घटक म्हणून गणना केली जाईल. या शहरांव्यतिरिक्त जिल्ह्यांच्या अन्य भागासाठी स्वतंत्र घटक असेल. मोठ्या शहरांमध्ये अधिक निर्बंध शिथिल करता यावेत, या दृष्टीनेच हे नियोजन करण्यात आले आहे.

रेल्वेसेवेवरील निर्बंध कायम
मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवेचा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना वापर करता येईल. सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करण्यास परवानगी नाही. संपूर्ण जून महिना रेल्वेसेवेचा सामान्यांना वापर करता येणार नाही, असे संकेत आहेत.[woo_product_slider id=”480″]

ई-कॉमर्स : वस्तूंच्या वितरणास परवानगी
कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये ई-कॉमर्सच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेबरोबरच अन्य वस्तूंच्या वितरणाला परवानगी देण्यात आली आहे.

खासगी कार्यालये बंदच
सरकारी कार्यालयांमध्ये २५ टक्के उपस्थितीस परवानगी असेल. खासगी कार्यालये किंवा आस्थापना बंदच राहतील. याबाबत आधीच्या आदेशात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

रुग्णसंख्येचे २ विभाग
कमी रुग्णसंख्या असल्यास सूट
रुग्णसंख्येनुसार २ विभाग करण्यात आले आहेत. ‘अ’ श्रेणीत कोरोना चाचणीत १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी कोरोनाबाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटा ४० टक्यांपेक्षा कमी भरलेल्या असल्यास निर्बंध शिथिल केले जातील. असे शहरे आणि जिल्ह्यांत दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील. अन्य दुकाने उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर. मात्र एकल दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाईल.

…तर कडक निर्बंध
चाचणीत कोरोनाबाधितांचे प्रमाण २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांंमध्ये कडक निर्बंध लागू असतील. अशा जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या जातील. जेणेकरून या जिल्ह्यांतून लोक बाहेर जाणार नाहीत वा अन्य जिल्ह्यातील नागरिकांना जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये येता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 2 =

vip porn full hard cum old indain sex hot