‘लाल सिंग चड्ढा’च्या वादादरम्यान आमिर खानने घेतली राज ठाकरेंची भेट

Read Time:1 Minute, 38 Second

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’या चित्रपटावरुन सध्या मोठा वाद उफाळला आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट खास चाललेला नाही. तसंच या चित्रपटाला बॉयकॉट करा असा एक मोठा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अशातच आता आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

काल संध्याकाळी आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान राज ठाकरेंच्या मुंबईतल्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेला होता. जवळपास एक तासभर दोघांच्यात चर्चा झाली.

मनसेचे पदाधिकारी सचिन मोरे यांनी आमिर खानसोबतचे फोटोही शेअरÞ केले आहेत. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट वादाच्या भोव-यात अडकला आहे. या चित्रपटातल्या काही सीन्सवरुन आक्षेप घेतला जात आहे.

अनेकजण हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. आमिर खानने यात देशविरोधी भूमिका साकारल्याचा आरोपही त्याच्यावर होत आहे. या सगळ्यादरम्यान आमिर खान -राज ठाकरे भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

two − 1 =