August 9, 2022

लातूर शहरातील दोन खाजगी रुग्णालयात मोफत लसीकरणाचा शुभारंभ

Read Time:2 Minute, 54 Second

लातूर : महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दोन खाजगी रुग्णालयात आजपासून मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्यातून या केंद्रांचा प्रारंभ महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी शिवपुजे हॉस्पिटल येथील मोफत लसीकरण केंद्रास भेट देवून पाहणीकरुन केला. यावेळी डॉ. संजय शिवपूजे, डॉ स्नेहा शिवपूजे, नगरसेवक आयुब मनियार, रघुनाथ मदने उपस्थित होते.

लातूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने सात केंद्रावर लसीकरण केले जात आहे. शनिवारपासून लसीकरणासाठी एक मोबाईल टीमही कार्यरत आहे.कामाच्या ठिकाणी जाऊन पात्र लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे.याशिवाय दहा खाजगी रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला गती देण्यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे व आयुक्त अमन मित्तल यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांसमवेत व्हिडिओ कॉंफरंंिसगद्वारे बैठक घेतली होती.खाजगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत आयएमएच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा काळे व सचिव डॉ.हनुमंत किनिकर यांनी खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधला.यातून ९ रुग्णालयांनी लसीकरण केंद्र सुरू करण्यास संमती दर्शवली आहे.यापैकी शिवपुजे हॉस्पिटल व ममता हॉस्पिटल या दोन रुग्णालयात सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

या रुग्णालयात लसीकरणासाठी लस पालिकेच्या वतीने पुरविली जात आहे. लसीकरणासाठी डॉक्टर,लस देणारा कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर, इंटरनेट, संगणक आदी सर्व सुविधा संबंधित रुग्णालयाकडून पुरविल्या जात आहेत. या दोनही केंद्रात मोफत लसीकरण केले जात आहे. शहरातील इतर रुग्णालयातही लवकरच मोफत लसीकरण सुरु केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

12 + 15 =

Close