July 1, 2022

लातूर-धनेगाव सिटीबस सेवेचा आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

Read Time:3 Minute, 16 Second

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या लातूर-धनेगाव सिटीबस सेवेचा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुरुवार दि. २ डिसेंबर रोजी करण्यात आला. ‘लातूर ग्रामीण’ च्या नागरिकांसाठी सुरु झालेली ही पहिलीच बससेवा आहे. या वेळी तिकीट काढून आमदार धिरज देशमुख यांनी नागरिकांसोबत प्रवासही केला.

प्रवाशांची मागणी आणि मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन लातूर महापालिकेच्या सिटीबस सेवेचा टप्याटप्याने विस्तार केला जात आहे. त्यानुसार आज लातूर ते (सोनवती, सारोळा मार्गे) धनेगाव या मार्गावर सिटीबस सुरु करण्यात आली. याचा शुभारंभ करून आमदार श्री. धिरज देशमुख यांनी ही सेवा तातडीने उपलब्ध करुन दिल्याबद्दल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, महापौर विक्रम गोजमगुंडे, महानगरपालिकिा आयुक्त अमत मित्तल व लातूर महापालिकेचे आभार मानले.

आमदार धिरज देशमुख म्हणाले, ‘ग्रामीण भागातील प्रवाशांची मागणी व त्यांची सोय विचारात घेऊन लातूर महापालिकेने ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. या सुरक्षित, सुलभ सेवेचा शालेय विद्यार्थी, महिला, नोकरदार व सर्वसामान्यांना चांगला लाभ होईल’. ही सुविधा सुरु केल्याबद्दल धनेगाव ग्रामपंचायत व युवक काँग्रेससह सोनवतीचे सरपंच भालचंद्र पाटील, सारोळा गावचे सरपंच आविष्कार गोजमगुंडे यांच्या वतीने आमदार धिरज देशमुख यांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानले.

यावेळी ट्वेन्टीवन कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमुख, लातूर बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, लातूर ग्रामीण संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, भगवानराव पाटील विजय नगरकर, प्रताप पाटील, पुनीत पाटील, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, बादल शेख, सचिन दाताळ, श्रीहरी चामले, विलास चामले, युवराज जाधव, सुभाष जाधव, बालाजी वाघमारे, सुंदर पाटील कव्हेकर, अरुण चामले आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

12 + nine =

Close