लातूररोड-नांदेड रेल्वेमार्गासाठी सर्वपक्षीय बैठक

Read Time:2 Minute, 45 Second

अहमदपूर : गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या लातूररोड ते नांदेड व्हाया चाकूर- अहमदपूर -लोहा -सोनखेड हा नवीन रेल्वे मार्ग मंजूर व्हावा यासाठी येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली.या बैठकीस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

प्रस्ताविकात जेष्ठ पत्रकार दिनकर मद्देवार यांनी लातूररोड ते नांदेड हा एकशे चार किलोमीटर मध्ये दक्षिण- उत्तर भारत जोडणारा, दक्षिण आणि दक्षिण मध्य विभागाला जोडणारा अविकसित भागाच्या विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण मार्ग असल्याचे सांगितले. रेल्वे संघर्ष समिती उदगीर चे सचिव बोर्डाचे माजी सदस्य मोतीलाल डोईजोड यांनीही मार्गदर्शन केले. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पाठपूरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेगणे,जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास महाजन, दलितमित्र उत्तम माने, प्रा.ङॉ.सय्यद अकबर, अ‍ॅड निखील कासनाळे, नगरसेवक अभय मिरकले, बाळासाहेब आगलावे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अरुणभाऊ वाघबर, प्रा.शादुल पठाण विचार व्यक्त केले. माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, अ‍ॅड. सुवर्णा महाजन, लक्ष््मीकांत कासनाळे संदिप चौधरी रवि महाजन, भाई इमरोज पटवेगर आदीनी सूचना केल्या. सूत्रसंचालन रामंिलग तत्तापूरे यांनी केले तर आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी दिनकर मद्देवार, जयप्रका भुतडा प्रा ङॉ.सय्यद अकबर, एन.ङी.राठोड चंद्रशेखर भालेराव, अविनाश मंदाङे, तानाजी राजे, जावेद बागवान, विकास राठोङ, रवी मद्रेवार, कुरेशी, मेघराज गायकवाड यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − 10 =