“लाज वाटली पाहिजे …… ” राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलीवुडमध्ये ऊमटतायत संमिश्र प्रतिक्रिया

Read Time:2 Minute, 23 Second

पॉर्न फील्म निर्मीतीच्या आरोपाखाली बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती ऊद्योगपती राज कुंद्रा यांस अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून २३ जुलैपर्यंत राज कुद्रांना पोलिस कोठडी सुनावण्यात आहे.

राज कुंद्रावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे बॉलीवुडमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. बॉलीवुडमधील अभिनेत्री राखी सांवतने यावर तीखट प्रतिक्रिया दिली आहे. मात्र राखीने राजची बाजु घेतली आहे.

शिल्पा शेट्टीने मेहनतीने बॉलीवुडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. शिल्पा आणि राज यांचा नेहमिच मदत करणारा स्वभाव आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना मुद्दामून त्रास देण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठीचे हे कारस्थान असल्याचे राखी सांवत म्हणाली आहे. तसेच राज कुंद्रासारख्या चांगल्या माणसावर असे आरोप करतांना लाज वाटली पाहिजे असेसुद्धा राखी सांवत म्हणाली आहे.

फोटिग्राफर विरल भयानी सोबत बोलतांना राखीने ही प्रतिक्रिया दिली आहे. कॉमेडी अभिनेता म्हणून ओळख असणार्‍या राजु श्रीवास्तवने मात्र राज कुंद्राच्या या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज कुंद्रासारख्या लोकांना केवळ पैशाशी घेणेदेणे आहे. आपली संस्कृती व संस्कार या गोष्टींचे त्यांना काहीच भान नाही असे तो म्हणाला आहे.

नेटकर्‍यांनीसुद्धा सोशल मिडियावर मीम्स व्हायरल करत राज कुंद्रावर जोरदार टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 − seven =