January 19, 2022

लहान मुलांसाठी जानेवारी, फेब्रुवारीत मिळू शकते लस

Read Time:3 Minute, 31 Second

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर अर्थात शुक्रवारी देशभरात सुमारे अडीच कोटी लसीचे डोस देण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून कौतुक होत असताना दुसरीकडे लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे १८ च्या खालच्या वयोगटातील मुला-मुलींसाठी अजूनही लसीची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, सिरमने लहान मुलांच्या लसीची तयारी केली असून, अशीच प्रक्रिया सुरू राहिली, तर जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी कोवावॉक्स लस मिळू शकते, असा विश्वास सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी व्यक्त केला.

सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या हडपसरमधील प्लांटमध्येच कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरू आहे. १८ पेक्षा वरच्या सर्वांना ही लस दिली जात असून आता १८ वर्षांखालील वयोगटाच्या लोकसंख्येलादेखील लस मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.
लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल, असे अदर पूनावाला म्हणाले. अनेक स्वयंसेवकांना तपासण्यासाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत. चाचण्या व्यवस्थित सुरू आहेत. या वर्षाखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल, असेदेखील पूनावाला म्हणाले.

लस किती सुरक्षित?
चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना अदर पूनावाला म्हणाले की, ही लस लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागेल. सर्व पालकांना त्यांची मुले सुरक्षित हवी आहेत. आम्हाला याचा विश्वास वाटतोय की कोवावॅक्सला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळालेली असेल.

९२० जणांवर लसीची चाचणी
२ ते १७ या वयोगटात ही लस दिल्यानंतर संबंधिताची प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते आणि ही लस किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहेत. यासाठी देशभरातील एकूण १० ठिकाणांहून ९२० स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ ठिकाणे पुण्यातील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 10 =

Close