January 22, 2022

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा

Read Time:2 Minute, 18 Second

मुंबई दि.२२ (प्रतिनिधी) लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी सुरू केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या राज्यातील बालरोग तज्ज्ञांसोबत समाजमाध्यमांमधून संवाद साधणार आहेत.

प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधत आहेत. रविवारी मुख्यमंत्री राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग् तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे.डॉ.सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.

हा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी 12 पासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर फेसबुक Facebook – https://www.facebook.com/CMOMaharashtra आणि युट्यूब

Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ येथे थेट पाहता येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील अधिकाधिक बाल रोग तज्ञांनी ऑनलाईन लिंकद्वारे सहभागी व्हावे असे आवाहन बाल रोग तज्ञ संघटनेचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ जयंत पांढरीकर यांनी देखील केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − seven =

Close