January 19, 2022

लस नाही तर गावात ‘एन्ट्री’ नाही

Read Time:3 Minute, 44 Second

नांदेड : प्रतिनिधी

कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या विषाणूने आता सर्वांची झोप उडविली आहे.मात्र याची गंभीरतेने दखल घेत जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला हिमायतनगर तालुक्यातील टेभूर्णीकरांनी प्रतिसाद देत गावात शंभर टक्के लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे.एवढेच नव्हे तर लस न घेता गावात प्रवेश करणा-यांना नो एन्ट्री केली आहे. यामुळे हे गाव सध्या चर्चेत आले आहे.

ओमीकॉनचे नवे संकट डोक्यावर असतांनाही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गावकरी लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत.मात्र हिमायतनगर तालुक्यातील टेभूर्णीकरांनी गावात गावात शंभर टक्के लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे.यासाठी गावक-यांनी लस नाही तर गावात बाहेरचे व्यक्ती,नातेवाईकांना गावात एन्ट्री न देण्याचा निर्णय घेतला आहे.आंरोग्य कर्मचा-यांनी सरपंच यशोदा पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील व उपसरपंच लक्ष्मीबाई जाधव, ग्रामसेवक अनिल कदम, लहाने, बांगर, आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी ही माहिती दिली.

सरपंच पाटील यांनी या कामात जातीने लक्ष घालून गावातील नागरिकांशी चर्चा सुरू केली. सोबत ग्रामसेवक अनिल कदम, मुख्याध्यापक लहाने, बांगर, पोलिस पाटील किसनराव जाधव, शिवाजी जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील, स्वच्छता समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव पाटील या सर्वांच्या मदतीने घरोघरी जाऊन १८ वर्षांवरील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, स्थलांतरित, कामासाठी बाहेर गेलेले ही सर्व माहिती उपलब्ध करून घेतली आणि गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले. आत्तापर्यंत गावात शंभर टक्के पहिला डोस अणि ७५ टक्केच्यावर दुसरा डोस असे लसीकरण झाले. गावांत येणारे फेरीवाले, भाजीपाला विकणारे, नातेवाईक यांना केंद्रात लस देऊन प्रवेश दिला जातो. लस न घेणा-यांना टेंभूर्णी गावात प्रवेश नाकारण्यात आला. तसेच या संदर्भातला सर्व आढावा घेऊन गावातील नागरिकांना नवीन व्हेरिएंट ओमीक्रॉनबद्दल माहिती देत गाव परत तिस-या लाटेकडे जाऊ नये, यासाठी लस घेणे आवश्यक आहे असे समजावत आहेत. लसीकरणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भालेराव, तुकाराम पौरे, काळे, ग्रामसेवक आनंद कदम, बापूराव माने, प्रभाकर माने, सुरेश देवसरकर, सुरेश पाटील, लक्ष्मीबाई जाधव, शिवाजी जाधव, किशनराव जाधव, विनायक माने, बाबुराव माने, विकास देवसरकर, किशोर कांबळे आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × three =

Close