लसीकरणाबाबत राकारणी थापा मारतात! सीरम ईन्स्टीट्युटच्या पुनावालांचे वक्तव्य

Read Time:1 Minute, 33 Second

मध्यंतरी वेग धरलेल्या लसीकरण मोहीमेस पुन्हा एकदा संथ गती प्राप्त झाली आहे. लसींच्या तुटवड्यामुळे शहरांतील अनेक ठिकाणची लसीकरणकेंद्रे बंद केली जात आहे.

या दरम्यानच सीरम ईन्स्टीट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी धक्कादायक विधान केले आहे. डिसेंबरपर्यंत देशातील सर्वांचे लसीकरण होणे शक्य नसून राजकारणी याबाबत थापा मारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लसींचे कॉकटेल करण्याच्या चर्चासुद्धा जोर धरत आहे. परंतू पुनावाला यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हणत लहाण मुलांवर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता होणार असल्याचे म्हटले आहे. लसीकरणाच्या ऊत्पादनाचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र तरिदेखील डीसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण होणे त्यांनी नाकारले आहे.

भाजप व भाजपचे माजी केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकरांनी हा दावा केला होता. डीसेंबर अखेरपर्यंत भारतातील प्रत्येकाचे लसीकरण केले जाईल असे त्यामध्ये म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve + 9 =