June 29, 2022

लसीकरणात महाराष्ट्राने ३ कोटीचा टप्पा ओलांडला

Read Time:1 Minute, 10 Second

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. आज दिवसभरात सुमारे ४ लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली.

लसीकरणात महाराष्ट्राने आज दुपारी दोनच्या सुमारास ३ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडला. लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून आघाडीवर आहे. आज झालेल्या लसीकरणामुळे सायंकाळी सात पर्यंत ३ कोटी २ लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. आज एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen + seventeen =

Close