लसीकरणाच्या अटीला दुकान मालकांकडून विरोध

Read Time:1 Minute, 57 Second

मुंबई : रविवार (दि. १५ ऑगस्ट)पासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटरमधील दुकान रात्री दहा वाजेपर्यंत उघडे राहतील. मात्र, एकीकडे या निर्णयाचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणा-य ग्राहकांना, दुकान मालकांना, या ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मॉल, शॉपिंग सेंटरमधील दुकानमालक एकीकडे दुकान रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत करतायत तर दुसरीकडे लसीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना प्रवेश मिळणार या घालून दिलेल्या नियमाचा मात्र कडाडून विरोध करत आहेत.

सामान्य दुकानात ज्याप्रकारे नियम आहेत तशाच प्रकारचे नियम मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये दुकानांनासुद्धा असावेत असे दुकानमालकांचे म्हणणे आहे. मागील दीड वर्षापासून मोबाईल शॉपिंग सेंटरमध्ये दुकान मालकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. आता तो पूर्ववत होण्यासाठी पूर्वीसारखे कोणतेही नियम आमच्यावर लादू नयेत. शिवाय लसीकरणाची अट रद्द करून आम्हाला तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी दुकान मालकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve − 7 =