
लसीकरणाचा आढावा घेऊनच शाळा सुरू कराव्यात – संजय बेळगे
नांदेड दि.२१ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार बालकांचे अधिकार आहेत त्याचा बोर्ड शाळेच्या दर्शनी भागात लावावा. तसेच शाळा सुरू करण्याबाबत लसीकरण स्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाशी संपर्क करून निर्णय घ्यावा अशी सूचना शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे यांनी आज केली .
आजची ही सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली .यात ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील गोरजेगावकर,, लक्ष्मणराव ठक्करवाड बबनराव बारसे, साहेबराव धनगे, अनुराधा पाटील ,संध्याताई धोंडगे , ज्योत्स्ना नरवाडे, स्वीकृत सदस्य बसवराज पाटील आणि संतोष देवराये यांची उपस्थिती होती .सभेचे प्रास्ताविक प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी केले. मागील इतिवृत्त व विषयांचे वाचन केले. शिक्षकांच्या लसीकरणाचा आढावा घेतला .अनेक शाळांना सुविधा नाहीत त्याची आहे तशी नोंद घ्यावी अशी सूचना साहेबराव धनगे यांनी केली. चटोपाध्याय वेतनश्रेणी ,मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची पदोन्नती आदी बाबींची चर्चा झाली .सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी यावेळी तालुक्यातील शैक्षणिक स्थितीचा आढावा सादर केला. लसीकरण झालेले शिक्षक व शिक्षण यासंदर्भात माहिती दिली. बैठकीस उपशिक्षणाधिकारी डी.एस.मठपती, बंडू आमदूरकर ,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास ढवळे प्रोग्रामर के.ए.काजी, सर्व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.