लवासा प्रकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले, सरकारला दिलं चॅलेंज

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 55 Second


नागपूर | नागपूर येथील हिवाळी अधिवेशन उद्या, 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राज्य सरकारवर (State Goverment) टीका केली.

Advertisements

हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

स्थगितीच्या बाबतीत म्हणालं, तर अनेक विभागामध्ये तरतूद होती दोन हजार कोटींची. प्रशासकीय मान्यता दिली. सहा हजार कोटी, हे काय चाललं होतं महाविकास आघाडी सरकारमध्ये. आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या. पण आम्हाला या राज्याचा काही लवासा करायचा नाही, असं त्यांनी म्हंटलंय. यावर अजित पवारांनी भाष्य करत थेट सरकारला चॅलेंज दिलं आहे.

माझी मागणी आहे, सगळ्या तुमच्याकडे यंत्रणा आहेत. तुम्ही लगेचच केंद्रिय यंत्रणा, राज्यातील यंत्रणा कामाला लावा आणि चौकशी करा, असं अजित पवार म्हणालेत.

आम्हाला काही अडचण नाही असं म्हटलंय. तसेच लोकायुक्त कायद्याचं आम्ही स्वागत करू, त्यातील योग्य अयोग्य काही बाबी आहेत का? ते पाहू चर्चा करू, जर काहीं चुकीचं असेल तर नक्कीच आम्ही त्याला विरोध करु, असंही त्यांनी म्हटलंय

महत्त्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *