January 19, 2022

“लवकरच राजकारणात प्रवेश करणार” महिला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंचा मोठा दावा

Read Time:2 Minute, 35 Second

महिलांच्या प्रश्नांना घेऊन नेहमिच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई समाजासमोर येत असतात. भुमाता ब्रिगेड नावाचे महिलांसाठी काम करणारे संघटन त्या चालवतात. नुकताच तृप्ती देसाईंनी मोठा दावा केलाय. समाजक‍ार्यासोबत लवकरच राजकारणात प्रवेश करुन नविन ईनींग सुरु करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळख असणार्‍या बिग बॉसच्या मंचावर त्या बोलत होत्या. बिग बॉसच्या या सीझनमध्ये तृप्ती देसाईसुद्धा होत्या. मात्र आता त्यांना खेळांच्या नियमानुसार खेळातुन माघार घ्यावी लागत आहे. यावेळी अभिनेता महेश मांजरेकर यांच्याशी बातचीत करतांना त्यांनी हा दावा केलाय.

बिग बॉसमध्ये अभिनेते तथा सेलिब्रिटी यांना एकत्र एका घरात ठेवण्यात येते. बिग बॉसकडून त्यांना विविध टास्क दिले जातात. अनेकदा घरात असणार्‍या खेळांडूंमध्ये खटके ऊडतात. हा एक मनोरंजनाचा कार्यक्रम असून मोठ्याप्रमाणात बघितला जातो.

तृप्ती देसाई यांचा बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतर सर्वांनी त्यांना निरोप दिला. यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रु आले होते. तृत्पी देसाईंनासुद्धा अश्रु अनावर झाले होते. यावेळी महेश मांजरेकरांनी देसाईंना बिग बॉसच्या दिवसाबद्दल व पुढील वाटचालीबद्दल विचारणा केली.

तृप्ती देसाई यांनी मागिल ५० दिवस माझ्यासाठी खुप आनंदाचे असल्याचे म्हटले. तसेच समाजकार्याने मी अनेकांची मने जिंकलीत. त्यामुळे आता लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्या म्हणाल्या. तृप्ती देसाई राजकारणात कुठल्या पक्षापासून व कशी सुरुवात करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =

Close