August 19, 2022

लतादीदींवर झाला होता विषप्रयोग

Read Time:2 Minute, 59 Second

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्या यशाच्या शिखरावर असताना कुणीतरी त्यांच्या जेवणात विष मिसळले होते आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गोष्टीचा उल्लेख खुद्द लता मंगेशकर यांनी केला होता.

ही घटना आहे १९६२ सालची. त्यावेळी लता मंगेशकर फक्त ३३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जेवणातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. १९६२ साली बीस साल बाद या चित्रपटासाठी लता दीदींना गाणे रेकॉर्डिंग करायचं होतं. ज्यासाठी संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र रेकॉर्डिंगच्या काही तासांपूर्वी लता दीदींची तब्येत बिघडली होती. डॉक्टरांना बोलवून त्यांचं चेकअप केलं होतं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की, लता मंगेशकर यांच्या जेवणात स्लो पॉइजन मिसळवले होते. त्यानंतर त्यांची बहिण उषा मंगेशकर यांनी स्वत: जेवण बनवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्या ंिहमत हरल्या नाहीत आणि गायन जगतात पुन्हा कमबॅक केले. म्हटले जाते की, लता दीदी जवळपास तीन महिने आजारी होत्या. त्यावेळी त्यांना आवाज गमावण्याचीदेखील भीती होती.

लोकांमध्ये होता हा गैरसमज
आजही या अपघाताबाबत लोकांमध्ये एक गैरसमज आहे की, त्यावेळी लता मंगेशकर यांनी आपला आवाज गमावला होता. पण तसे नव्हते. स्वत: लता मंगेशकर यांनी सांगितले होते की, त्यांचा आवाज कधीच गेला नाही. त्या घशातून सुदृढ होती पण शरीर अशक्त झाले होते आणि त्यामुळे त्यांना रेकॉर्डिंग करता आले नव्हते. त्या पूर्णपणे ब-या झाल्यानंतर त्यांनी कहीं दीप जले कहीं दिल हे गाणे गायले होते आणि हे गाणे सुपरहिट ठरले होते.

माहित होते विष कोणी दिले, पण…
हैराण करणारी बाब आहे की लता मंगेशकर यांना माहित आहे की त्यांना कोणी विष दिले होते पण तरीही त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. कारण मंगेशकर कुटुंबीयांकडे त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 5 =

Close