लग्नाचा नियम मोडल्याने ५० हजारांचा दंड

देवणी तालुक्यातील तळेगाव भोगेश्वर येथे सोमवारी दि.२६ एप्रिल रोजी कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडवत विवाह सोहळ्यात शंभराहून अधिक लोकांनी हाजेरी लावल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास येताच ग्रामपंचायतीच्या वतीने सामान्य पावतीच्या मोबदल्यात ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यावर अनेक निर्बंध लादन्यात आले आहेत. दोन तासाच्या आता लग्न आणि २५ पेक्षा अधिक लोक नसावेत असा नियम आहे, असे असतानाही देवणी तालुक्यातील तळेगाव भोगेश्वर येथे वाजत-गाजत लग्न लावण्यात आले. याची माहिती देवणी येथील तहसीदारांना मिळाली. त्यांनी तात्काळ लग्न मंडपात जावून परिस्थित स्वत: पाहिली. त्यावेळी तेथे शंभराहून अधिक महिला जेवणाच्या पंगतीत हजर होते.

प्रशासन हजर झाले असे लक्षात आल्याने अनेकांनी काढता पाय घेतला होता. .सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय तळेगावच्यावतीने दंडात्मक कारवाई करीत ५० हज़ाराचा दंड लावण्यात आला आहे. गटविकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव आणि भरारी पथकातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + ten =

vip porn full hard cum old indain sex hot