January 21, 2022

लखीमपूर खेरीच्या तपासावर पंजाब, हरयाणा हायकोर्टाचे न्यायाधीश ठेवणार देखरेख

Read Time:2 Minute, 33 Second

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती राकेशकुमार जैन यांच्याकडे सोपवली आहे. याशिवाय या प्रकरणाचा तपास करणाºया एसआयटीमध्ये तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांचा समावेश करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हावा, याची खात्री निवृत्त न्यायमूर्ती जैन करतील, असे कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टात या प्रकरणी ८ नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. या प्रकरणात शेतकरी, एक पत्रकार आणि भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचे कोर्टाने म्हटले होते. या सर्व हत्येची प्रकरणे एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे न्याय मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. यामुळे तपासावर देखरेख ठेवण्यासाठी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे न्यायाधीश अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नसतील. आमच्या दृष्टीने पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रणजित सिंग आणि न्यायमूर्ती राकेशकुमार जैन हे आहेत. तिन्ही प्रकरणांचा तपास योग्य प्रकारे होईल आणि आरोपपत्र वेळेत दाखल केले जातील, हे माजी न्यायमूर्ती निश्चित करतील, असे कोर्टाने म्हटले होते. सरन्यायाधीश एन. व्ही. रमना, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने निवृत्त न्यायमूर्तींकडे तपासाची देखरेख सोपवण्याबरोबरच एसआयटीमध्ये बदल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 15 =

Close