January 21, 2022

लखीमपूरमधील हल्ला उत्तर प्रदेश सरकारनेच घडवून आणला

Read Time:2 Minute, 15 Second

पुणे : लखीमपूर हत्याकांडासारखी प्रकरणे आम्ही कधीच सहन करणार नाही. असा कुठलाही अन्याय कोणत्या महिलेवर आणि शेतक-यांवर होणार असेल तर कोणाचीही सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. तिथे लोक शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत होते. त्यांच्यावर झालेला हल्ला उत्तर प्रदेश सरकारनेच केला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीची भूमिका पवारांनी दिल्लीत मांडली असल्याची माहितीही खासदार सुळे यांनी दिली.

देशात मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली ती पुण्यामध्ये. ही शाळा सुरू करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करत महात्मा फुलेंनी १८४८ रोजी मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. आजही अनेक भागातील मुलींना शिक्षणापासून दूर रहावे लागत आहे. मात्र आता महात्मा फुले यांचे मूळ गाव असणा-या खानवडीत मुलींची मोठी शाळा बांधली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
याठिकाणी महात्मा फुलेंचे स्मारकही होईल.

तसेच सातारा, खानवडी आणि पुणे अशा तीनही ठिकाणी मुलींच्या शाळा बांधण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहितीही खासदार सुळे यांनी दिली. तसेच राज्यातील ऐतिहासिक ठिकाणांचा विकास आणि डागडुजीवरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × five =

Close