January 22, 2022

रोज १ कोटी डोसचा प्रयत्न

Read Time:2 Minute, 56 Second

नवी दिल्ली : केंद्र सरकार आता रोज १ कोटी नागरिकांना लस देण्याची योजना आखत आहे. जुलै महिन्याच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यापासून या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार लसींच्या ३० ते ३२ कोटी डोसची उपलब्धता निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. या योजनेनुसार दर महिन्याला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे २५ कोटी डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय ५ ते ७ कोटी डोस दुस-या लसींचे पुरवले जातील. यात बायोलॉजिकल ई, सीरमची नोवावॅक्स, जिनोव्हा एमआरएनए, जायडस कॅडीला डीएनए आणि स्पुटनिक या लसींचाही समावेश आहे.

लसीचा एकच डोस पुरेसा
येत्या काळात कोविशिल्ड या लसीचा फक्त एकच डोस दिला जावा, यावर चर्चा सुरू आहे. लसीचा एक डोस कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रभावी आहे का, याचा अभ्यास केला जात आहे. जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुटनिक लाइट आणि कोविशिल्ड लस एका पद्धतीने तयार झाली आहे. या स्पुटनिक लाइट आणि जॉन्सन अँड जॉन्सन या दोन लसी एक डोसच्या आहेत.

मिक्सिंग लस
दोन लसींचे मिक्सिंग म्हणजे एक डोस वेगळ्या लसीचा आणि दुसरा डोस वेगळ्या लसीचा यावर १ महिन्याच्या आत अभ्यास सुरू करण्याची योजना आहे. हा अभ्यास दोन ते अडीच महिन्यात पूर्ण होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नोंदणी अधिक सुलभ करणार
लसीकरणाची नोंदणी अधिक सुलभ करण्यासाठी एक ते दोन आठवड्यांमध्ये आणखी एक अ‍ॅप कोविन प्लॅटफॉर्मशी जोडण्याची मंत्रालयाची योजना आहे. या अ‍ॅपमध्ये लसीचा क्रमांक नोंदवण्याची सुविधा असेल. जे डेटासोबत जोडली जाईल. लस घेतल्यानंतर जी काही लक्षणे किंवा साइड इफेक्ट दिसल्यास त्याची नोंदणी होईल. ही नोंदणी केल्यावर जिल्हा लसीकरण अधिका-याकडे रिपोर्ट जाईल. ते तपास करून डेटामध्ये त्याचा समावेश करतील, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − four =

Close