May 19, 2022

रेल्वेस्थानकासमोर ट्रॅक्टरसह ऊसाच्या दोन ट्रॉल्या उलटल्या

Read Time:1 Minute, 41 Second

परभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेल कुंजबिहारीसमोरच्या कॉर्नरवर ऊसाच्या दोन ट्रॉल्या घेवून जाणारा ट्रॅक्टर हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच पूर्णत: उलटला. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बसस्थानकाकडे एक ट्रॅक्टर ऊसाच्या दोन ट्रॉल्या घेवून निघाला होता. रेल्वेस्थानक परिसरात हॉटेल कुंजबिहारीच्या कॉर्नरवर ट्रॅक्टर चालकाला वळण घेतेवेळी अंदाज आला नाही.

त्या वळणावर ट्रॅक्टरच्या हेडसह दोन्ही ट्रॉल्या हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोरच अचानक उलटल्या. हेडसह ट्रॉल्या उलटल्याने या परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्ष दर्शनींनी ट्रॉलीखाली कोणी दबले तर नाही ना, याची खातरजमा सुरु केली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. तसेच ट्रॉलीतील ऊस संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने वाहतूक ठप्प झाली. शहर वाहतूक पोलिस यंत्रणेच्या कर्मर्चा­यांनी धाव घेवून वाहतूक दुर्स­या बाजूने वळविली आणि ट्रॉलीसह हेड हटविण्याचे काम सुरु केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 4 =

Close