January 19, 2022

रेल्वेचे एसी भाडे पूर्वीपेक्षा स्वस्त होणार

Read Time:4 Minute, 35 Second

नवी दिल्ली : सणांचा हंगाम पाहता भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे ट्रेनमधील एसी कोचचे भाडे पूर्वीपेक्षा स्वस्त होणार आहे. प्रवाशांना एसीच्या प्रवासाचा स्वस्तात आनंद घेता यावा, यासाठी रेल्वेने अनेक गाड्यांमध्ये ३ टियर इकॉनॉमी डबे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या डब्यांमध्ये प्रवास करण्यासाठी कमी भाडे द्यावे लागेल. लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांमध्ये नवीन एसी डबे जोडण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला.

उत्तर रेल्वेने आपल्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांमध्ये हा विशेष प्रकारचा एसी बोगी जोडण्याची घोषणा केली. ताज्या अपडेटनुसार, ८३ प्रवासी नवीन प्रकारच्या एसी कोचमध्ये प्रवास करू शकतील, तर पूर्वीच्या डब्यात ७२ प्रवाशांची जागा होती. या बोगीचे दोन फायदे होतील असे रेल्वेने म्हटले आहे. एकीकडे अधिक प्रवाशांना प्रवासाचा लाभ मिळेल, ज्यामुळे रेल्वेची कमाई देखील वाढेल. दुसरा फायदा प्रवाशांना होईल कारण या डब्यात एसी भाडे आधीच्या डब्यापेक्षा कमी असेल.

काय आहेत सुविधा?
११ अतिरिक्त प्रवासी नवीन डब्यात प्रवास करू शकतील. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन अनेक आधुनिक व्यवस्था करण्यात आल्यात. प्रवाशांना मोबाईल फोन आणि मॅगझिन धारक मिळतील आणि अग्निसुरक्षेचीही पूर्ण व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक बर्थ समोर पर्सनलाइज्ड रीडिंग दिवे लावण्यात आलेत, जेणेकरून प्रवाशांना वाचायचे असेल तर फक्त त्याला प्रकाश मिळेल, बाकीच्या प्रवाशांच्या झोपेत अडथळा येणार नाही. एसी व्हेंट, यूएसबी पॉइंट, मोबाईल चार्जिंग पॉइंट प्रत्येक सीटवर देण्यात आलेत.

कोणत्या गाड्यांना स्वस्त एसी कोच?
गोरखपूर-कोचुवेली एक्सप्रेस
गोरखपूर-सिकंदराबाद एक्सप्रेस
गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेस
लोकमान्य टिळक (टर्मिनस) -गोरखपूर एक्सप्रेस
लोकमान्य टिळक (टी)-वाराणसी एक्सप्रेस
लोकमान्य टिळक (ळ) झ्र छपरा एक्सप्रेस
लोकमान्य टिळक (टी) झ्र फैजाबाद एक्सप्रेस

नवीन इकॉनॉमी कोचची वैशिष्ट्ये
या नवीन डब्यांमध्ये ७२ ऐवजी ८३ प्रवाशांना बसण्याची सोय असेल. म्हणजेच आधीच्या बोगींपेक्षा ११ अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. या सर्व डब्यांची रचना दिव्यांगजनांची सोय लक्षात घेऊन करण्यात आली. मोबाईल फोन, मासिक धारक आणि अग्निसुरक्षा यासंबंधी अनेक आधुनिक व्यवस्था करण्यात आल्यात. आधुनिक ३ स्तरीय इकॉनॉमी क्लास एसी कोच गाड्यांमध्ये जोडले जातायत, जे १६० किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. हे डबे अशा प्रकारे बांधण्यात आले आहेत की, प्रवाशांना बसताना किंवा झोपताना आराम मिळेल. बर्थला मॉड्यूलर डिझाईन देण्यात आले, वरच्या बर्थवर चढण्यासाठी खास डिझाइन केलेली शिडी लावण्यात आली, जेणेकरून इतर प्रवाशांना त्रास होणार नाही. डब्यात प्रवासी माहिती प्रणाली बसवण्यात आली आहे जी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे आणि त्यावर संपूर्ण प्रवासाची माहिती उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =

Close