
रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार
मुंबई दि २४ (प्रतिनिधी) राज्यातील रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी झालेल्या पंतप्रधानांचे लक्ष वेधले होते. याला प्रतिसाद देताना आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा पुरवठा होत होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की , २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेम्डीसीव्हीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.
More Stories
5जी लाँचच्या आधीच स्वदेशी 6जीची तयारी
नवी दिल्ली : 5जी नेटवर्क लवकरच भारतात रोलआऊट होणार आहे. जीओ, एअरटेल, व्हिआय या तिन्ही कंपन्या आता 5जीच्या तयारीत व्यस्त...
संजय राठोडांना मंत्रिपद?; फडणवीसांनी दाखवले मुख्यमंंत्र्यांकडे बोट
पुणे : शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. पण, ज्या नेत्याविरोधात भाजपने आरोपाचा धुरळा उडवला होता, त्याच संजय...
प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश...
पॉपस्टार ओलिविया न्यूटन जॉनचे ७३ व्या वर्षी निधन
नवी दिल्ली : चित्रपटातील ७० च्या दशकातील सर्वात मोठ्या पॉप स्टारपैकी एक आणि चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका आणि...
अखेर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार
मुंबई : ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे ११ वाजता पार पडला....
मंत्र्यांनी आता राज्यातील विकासाची कामे करावीत
मुंबई : अखेर आज राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ...