रेणापुरात माकडाचा धुमाकूळ

Read Time:3 Minute, 1 Second

रेणापूर (प्रतिनिधी) गेल्या अनेक महिन्यापासुन रेणापूर शहरात एका माकडाने धुमाकूळ माजवल्यामुळे रस्त्यांने जाणा-या महिला- मुलींना व बाजारपेठेतील फळगाडेवाले, दुकानदार , भाजीपाला दुकानदारांंना या माकडांचा त्रास होत आहे. हे माकड अचानक हल्ला करीत असल्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच या माकडाला वनविभागाच्या अधिकारी कर्मचा-यांंनी जेरबंद करावे अशी मागणी रेणापूर शहरवासियातून केली जात आहे.

गेल्या काही महिन्यापासून शहरात एक माकड वास्तव्यास असून हे माकड येथील बाजारपेठेतील जुने विश्राम गृह, सराय मोहल्ला गजबजलेल्या भागात वास्तव्य आहे. दिवसे दिवस या माकडाने उच्छाद मांडून शहरवासीयांना हैराण केले आहे. भर बाजारातपेठेत हे माकड वास्तव्यास असल्यामुळे कधी कोठून हल्ला करेल हे सांगता येत नसल्याने या भागात येणारी माणसे पुढे पाहून चालण्याऐवजी वर इकडे तिकडे पाहून चालत आहेत. चांदणी चौकात सतत वाहनांची वर्दळ असते. बाजारपेठेत खरेदीसाठी येणा-या नागरीकांवर हे माकड हल्ला करीत आहे. त्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुत्रे व इतर प्राण्यांवर हे माकड हल्ला करून जखमी करीत असल्याच्या घटना घडत आहेत. बाजारपेठेलगत असलेला सराय मोहल्ला या भागातील घराच्या छतावर जाऊन वाळू घातलेले कपडे, गृहउपयोगी साहित्य खाऊन फस्त करणे, खिडक्यांचे तावदाने तोडून घरात प्रवेश केल्याच्या घटना घडत आहेत. तसेच महिला व लहान मुला मुली व नागरीकावर अचानक हल्ला करीत असल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माकड ताब्यात घेण्याची मागणी
या माकडाने रेणापुर शहरांत उच्छाद मांडला असून त्याच्या या कृतीमुळे शहरवासियांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने यांची गांभियाने दखल घेऊन या माकडास पकडून जंगलात सोडून देण्यात यावे, अशी नागरीकांतून करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − fourteen =