August 19, 2022

रेकॉर्डवरील ४४ गुन्हेगारांची झाडाझडती

Read Time:2 Minute, 38 Second

नांदेड: प्रतिनिधी

जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, अनेक प्रकरणातील गुन्हेगार मोकाट आहेत. गुन्हेगारी आळा बसावा यासाठी पोलिस विभागाने पावले उचलायला सुरूवात केली असून, सोमवारी शहरातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेर्कार्डवरील ४४ गुन्हेगार चेक करण्याची संयूक्त कारवाई करण्यात आली.यात हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला पकडण्यात आले.तर विनाकारण रस्त्यावर फिरणा-या टवाळखोरांची धुलाई देखील केली.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेकार्डवरील आठ गुन्हेगाराची तपासणी केली.यात चौघांवर कारवाई करण्यात आली.यात जिल्हयातून हद्दपार केलेला गणेश अमरसिंह ठाकुर राग़ुरूनगर यांच्याकडून खंजीर जप्त केले.वजीराबाद पोलिसांनी केलेल्या नऊ जणांच्या तपासणीत त्यातील माधव त्र्यंबक पवळे रा.औराळा ताक़ंधार यास पकडून त्यांच्याकडून गुप्ती जप्त केली. नांदेड ग्रामीण हद्दीत रेकार्डवरील चार गुन्हेगारांची चौकशी केली.

तसेच पोलिसांनी गस्ती दरम्यान लातूर फाटा, कौठा, विष्णुपूरी या भागात विनाकारण फिरणा-या टार्गट लोकांची चांगलीच धुलाई केली.इतवारा ठाणे हद्दीत चार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. गस्ती दरम्यात काही जणांना लाठीचा प्रसाद दिला. भाग्यगनर हद्दीत आठ गुन्हेगाराची चौकशी केली यात रेकार्डवरील सात जणांना ठाण्यात आणून कारवाई केली.ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे,अपर पो.अ. निलेश मोरे,विजय कबाडे,उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठाण्याचे पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

6 + 4 =

Close