रितेश देशमुखचा त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल मोठा खुलासा

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 30 Second


मुंबई | बाॅलिवूडमधील(Bollywood) लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलिया(Genelia D’Souza). या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. तसेच या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे.

Advertisements

रितेश-जेनेलियाच्या जोडीला ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळाली. याच चित्रपटादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. रितेशचं घराणं राजेशाही असल्यानं सुरूवातीला या दोघांच्या लग्नाला विरोध झाला होता, परंतु दोघांच्या प्रेमापुढं हा विरोध फार काळ टीकू शकला नाही.

परंतु नुकतंच रितेशनं त्याच्या पहिल्या प्रेमावषयी खुलासा केला आहे. त्याला मुलाखतीदरम्यान प्रेमाची व्याख्या विचारण्यात आली. यावेळी त्यानं पहिल्या प्रेमाविषयी सांगत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रितेशनं दिलेल्या या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

रितेश म्हणाला की, प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी असू शकते. तसेच वयानुसार प्रेमाची व्याख्या बदलत असते, वयानुसार तुमच्या प्रेमाचा दृष्टिकोण बदलत असतो, असंही रितेश यावेळी म्हणाला.

मी काॅलेजला असताना परीक्षेच्या वेळी एक मुलगी माझ्यासमोर बसायची. मग पेपर लिहित असताना मला फक्त तिचे केस आणि हात दिसायचे, पण तरीही तेवढं पाहून मी खुश असायचो. पण याबद्दल मी तिला कधीच सांगू शकलो नाही, असंही तो म्हणाला.

दरम्यान, या सगळ्या गप्पा रितेश-जेनेलियाच्या आगामी ‘वेड’ चित्रपटाबद्दल एका वेबसाइटला बोलताना रंगल्या होत्या. मुख्य म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनं केलं आहे. हा चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *