राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात पोलिस कर्मचारी ठार

Read Time:2 Minute, 16 Second

 

जळको : नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ पोलिस गाडी रस्त्याच्या बाजूला उलटून झालेल्या अपघातात उदगीर शहर पोलिस ठाण्यातील या पोलिस गाडीवरील पोलिस चालकाचा उदगीर येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना दुर्देवी मृत्यू झाला . तर एक पोलिस गंभीर जखमी झाला आहे.

उदगीर शहर पोलिस ठाण्याचे वाहन क्रमांक एम एच २४ ए डब्ल्यू – ९३४९ हे वाहन घेऊन पोलिस कर्मचारी गोपाळ भालेराव व चालक मच्छींंद्र वरटी हे दोघेजण दि २९ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे शासकीय कामानिमित्त गेले होते. तेथून ते कामकाज आटोपून रात्री उशीरा परतत होते . राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर संध्याकाळी नऊते दहा वाजण्याच्या दरम्यान तिरुका गावाजवळ असलेल्या वळणावर जीप उलटली.जीप उलटून रोडच्या बाजूला दूरवर जाऊन २ ते ३ पलट्या खात ही जीप खड्ड्यात कोसळली.

यामध्ये उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गोपाळ भालेराव, तसेच मच्छींद्र वरटी यांना गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती कळताच जळकोट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम हे आपल्या पोलिस साथीदारांसह घटनास्थळी पोहोचले. या दोघांनाही तात्काळ उदगीरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना जीपचे चालक पोलिस कर्मचारी मच्छींद्र वरटी यांचा दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 2 =