राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकाने सुपारी घेवून नाव बदनाम करण्याचा धंदा सुरू केला


नांदेड जिल्हा पोलीस दलाची सुत्रे औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून हालत आहेत काय?
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन महिन्यांपुर्वीच झाल्या होत्या. परंतू लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. काल तीन पोलीस उपनिरिक्षकांना या संदर्भाने कार्यमुक्त करण्यात आले आहे. ही कार्यमुक्ती माझ्यामुळे घडली असा दावा स्थानिक गुन्हा शाखेतील एक पोलीस अंमलदार करत आहे. नांदेड जिल्ह्यात योगेश्र्वर कार्यरत आहेत. त्यांनी यातील सत्यता पाहावी. किंबहुना या प्रकरणाची सुत्रे औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून हलली असतील याचा शोध घ्यावा. सेवानिवृत्त झाल्यानंतर सुध्दा अनेकांना आपल्या काड्या करण्याच्या वृत्तीला थांबवता येत नाही हे खरे असले तरी कुठे तरी अंत होत असतो. हे सुध्दा तेवढेच खरे आहे. या प्रकरणाला हवा देण्यासाठी औरंगाबादकरांनी राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्यानंतर सुध्दा कोणाच्यासाठी तरी सुपारी घेवून नाव बदनाम करण्याचा नवीन धंदा सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आपल्या जीवनात फक्त 43 वर्ष जगलेले, 19 व्या शतकातील पत्रकार तथा लेखक स.आदत हसन मंटो म्हणतात, “अपने बारे में ना किसी पिर से पुछो ना किसी फकीर से बस थोडी देर आँखे बंद कर के अपने जमीर से पुछो..’ मी असा आहे, मी तसा आहे, मी असे वाघ मारले आहेत असे म्हणून आपली प्रशंसा होत नसते. ती प्रशंसा इतरांनी केली पाहिजे असे सेवानिवृत्त अधिकाऱ्याबद्दल आम्हाला म्हणायचे आहे. असे लिहिण्याची वेळ यामुळे आली की, लाहोरच्या हिरामंडी मधील वेश्या म्हणतात हम हत्या नहीं करते हम सजा देते है। हत्या तर तुम्ही करत आहात विश्र्वासाची, श्रध्देची आणि असीम प्रेमाची. आमच्यासाठी काही हा पहिला प्रसंग नाही. 20 -25 वर्षापुर्वी हा प्रसंग लिहिण्याची वेळ आली असती तर आमच्या अश्रुंना वाटा मिळाल्या नसत्या. परंतू या 20-25 वर्षात असे अनंत प्रसंग आम्ही अनुभवल्यामुळे आता अश्रु सुकले आहेत. असो आम्हाला जेंव्हा-जेंव्हा मोठी अडचण येते तेंव्हा आम्ही सुनिश्चित करतो की आम्ही विजयाच्या जवळ पोहचलो आहोत. म्हणूनच आज दगडीचाळीमध्ये असणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले होते की, विश्र्वास करायचा असेल तर रिंदा या दहशतवाद्यावर कर कारण तो छातीत गोळी मारेल, पोलीसांवर कधीच विश्र्वास करू नकोस कारण ते पाठीत खंजीर मारतात. मला सेवानिवृत्तनंतर पाहा अशी उपटसुंब शब्दांची रचना करून आपण अनेकांना बनवले. त्यात आमचाही क्रमांक लागला. तुम्ही पहिले व्यक्ती नाहीत ज्यांनी असे केले आहे. त्यामुळे आता काही वाईट वाटत नाही आहे.
नांदेडचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून काढल्यानंतर त्यांनी नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावर एक सभा घेतली होती आणि त्या सभेत माझी सुपारी कोणी दिली आणि कोणी घेतली हे तरी मला कळू द्या असे शब्द वापरले होते. त्याप्रमाणे प्रेमाच्या नाजुक रोपट्याला किड लावून तुम्ही ही सुपारी कोणाकडून घेवून आमची बदनामी केली हे तरी कळू द्या.
घडला प्रकार असा सुरू झाला की, तीन पोलीस उपनिरिक्षकांना नवीन जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. ही कार्यमुक्ती मी केली आहे अशी बढाई स्थानिक गुन्हा शाखेतील एक पोलीस अंमलदार मारत आहे. योगेश्र्वरांनी हे पाहायला हवे की, ही सुत्रे औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून तर हलली नाहीत. याबद्दल नांदेडचे कवी शैलेश कवठेकर म्हणतात जग जिंकण्याआधी मन ताब्यात ठेवावे लागते, त्याच खऱ्या माणसाने मार्गदर्शन सुध्दा करावे. आजच्या या जगात सर्वच खोटारडे आहेत. याबद्दल कोणी मेला तर तो मजबुर होता की त्याने बलिदान दिले हे म्हणत असतांना खरी पध्दत ही आहे की, चुका ज्याच्या होतात त्याचेच बलिदानपण होते. हे करत असतांना तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलाची सुत्र हलविण्याचा प्रयत्न करत आहात. नांदेड जिल्हा पोलीस दलात तुमच्यासारखे कसबी, हुन्नरी असे व्यक्तीमत्व दुसरे नाही काय? असा प्रश्न उपस्थित होतो. तुम्हाला काम नसेल तर आपला मोकळा वेळ देवाच्या चरणी अर्पण करा आणि भविष्यात आपल्याला सुख व आनंद भेटो यासाठी प्रयत्न करा.जो पोलीस अंमलदार तिन पोलीस उपनिरिक्षकांना आताच वाट लावली अशी वल्गना करत फिरत आहे. त्याच्याविरुध्द सुध्दा योगेश्र्वर काही कार्यवाही करतील अशी अपेक्षा आहे. घडलेला प्रकार माझ्या बिटमध्ये तु का छापा मारलास यावरून सुरू झालेला आहे. त्या पोलीस अंमलदाराचे कॉल रेकॉर्ड तपासण्यासाठी काही वेळ लागेल काय? आणि ते झाल्यावर काय अवस्था होईल.
तुम्हीच आम्हाला सुर्याजी पिसाळ तयार करायला लावला होतात. तेंव्हा मी कोठेही उभा राहुन हे सांगू शकतो असे शब्द वापरले होते.आज आम्ही आम्हाला सत्यता सांगणाऱ्या व्यक्तीवर का अ विश्र्वास करावा. कारण तो तर आम्हाला वेळेसह कॉल किती वाजता आला होता हे सांगतो आहे. याबद्दल आम्ही उल्लेखीत करू इच्छीतो की, म्हणतात कंदील जरी सुर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याच महत्व सुर्या इतकच असत. म्हणून आमची कितीही बदनामी केली तरी आम्ही स्वत:ला कधीच कमी समजलेले नाही. आम्हाला माहित आहे की, कितीही चांगली गाडी ओढणाऱ्या घोड्याला चाबकाचे फटके पडतातच. झाडांनी कितीही चवदार गोड फळे दिली तरीही दगडांचा मार त्यांना चुकत नसतो. तसेच आमची 30 ते 35 वर्ष आम्ही सत्य पत्रकारीतेत घालवून अनेकांचा रोष पत्कारला आहे आणि आजही आमची सुटका लोकांच्या टिकेतून होणारच नाही हे स्पष्ट झाले. विश्र्वास हा एक आरसा आहे. तोडला तर त्याचे रुप पुर्वीसारखे येत नाही आणि जोडला तर त्यात दिसणारे प्रतिबिंब पुर्वीच्या गुणवत्तेचे नसते म्हणूनच आज आम्हाला आपल्या बद्दल ही अपेक्षा नव्हती एवढे लिहिण्या व्यतिरिक्त काही शिल्लक नाही. सत्य इसलिऐ मौन हो जाता है की, उसे पता होता है की कुछ बातोंे का जबाब समय देगा। या शब्दांवर विश्र्वास ठेवून आम्ही पुढे सुध्दा आमच्या जिवनातील ओनली फॉर ट्रुथ याच तिन शब्दांवर जगणार आहोत आणि आलेल्या त्रासाला रस्त्यावर उतरण्यासाठी निमीश मात्र ही वेळ लावणार नाही . तुमच्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना आम्ही संयम आणि सभ्यतेचा पदर सोडलेला नाही. कारण आम्ही विचारांमध्ये आणि संस्कारांमध्ये बांधलेलो आहोत. आम्हाला उद्याची चिंता कधीच नव्हती. पण आता नक्कीच तुमच्या उद्याची उत्सुकता आहे. घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत वाढते, शेत रस्त्यावर असेल तरी त्याची किंमत वाढते पण माणुस रस्त्यावर आला तर त्याची किंमत उरत नसते हे शब्द बहुदा कधी तुम्ही ऐकले नसतील. आज वाचा आणि अभ्यास करून ठेवा. ज्या लोकांना आमच्यावर विश्र्वास आहे त्यांना स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि ज्या लोकांनी अर्थात आपण आमचा विश्र्वास घात केला तशी मंडळी आमचे स्पष्टीकरण कधीच ऐकणार नाही हे आम्हाला माहित आहे. त्याची चिंता आम्ही कधीच केलेली नाही पुढेही करणार नाही.


Post Views: 23


Share this article:
Previous Post: आंबेडकरी चळवळ; विचारसरणी व तत्वज्ञानाचे भाष्यकार – ऍड. बाळासाहेब आंबेडकर

May 10, 2024 - In Uncategorized

Next Post: महिलेची महिलेने केली 2 लाख 5 हजारांची फसवणूक – VastavNEWSLive.com

May 10, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.