August 19, 2022

राष्ट्रपतींसह राजकीय नेत्यांची घरे पेटविली

Read Time:3 Minute, 8 Second

कोलंबो : श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात आल्यानंतर आता तिथे राजकीय संकट उभे राहिले आहे. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी आणीबाणी लावल्यानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज राजीनामा दिला असला तरी देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. महिंदा राजपक्षे यांन राजीनामा दिल्यानंतरदेखील परिस्थिती बदलली नाही. एवढेच नव्हे, तर राष्ट्रपती, माजी पंतप्रधान राजपक्षे यांच्यासह राजकीय नेत्यांचे घरे पेटवून देण्यात आली आहेत.

श्रीलंकेत ठिकठिकाणी हिंसेच्या घटनांची माहिती समोर येत आहे. आंदोलकांनी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे, राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि इतर नेत्यांच्या घरांना पेटवून दिले आहे. महिंदा राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलकांनी घेराव घातल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळपासून झालेल्या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या खासदाराचा आंदोलकांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाला, तर १५० लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू झालेकी काय, अशा चर्चा आहे.

श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोलंबेमध्ये सैन्याला तैनात करण्यात आले आहे. पोलिस आंदोलनकर्त्यांना आणि सरकार समर्थकांना दूर कर ताना दिसून आले. आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्यादेखील फोडल्या. सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य सनथ निशांत यांचे घर पेटवून देण्यात आले आहे. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी आंदोलकांचा विरोध करण्यासाठी ग्रामीण भागातून लोक आणले होते.

महिंदा राजपक्षे यांनी राजीनाम्यापूर्वी ३ हजार लोकांना संबोधित केले. राष्ट्रहितासाठी राष्ट्राचे संरक्षण करणार असे महिंदा राजपक्षे म्हणाले. यानंतर राजपक्षे समर्थक बाहेर आले आणि त्यांनी आंदोलकांचा तंबू उखडून टाकला, यानंतर दोन्ही गट भिडले असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 + 7 =

Close