January 21, 2022

रावत दाम्पत्याच्या अस्थीचे विसर्जन

Read Time:1 Minute, 6 Second

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थींचे उत्तराखंडमधील हरिद्वार गंगेत विसर्जन करण्यात आले.

जनरल बिपीन रावत यांच्या दोन्ही मुली आज सकाळी दिल्ली येथून लष्कराच्या विशेष विमानाने त्यांचे वडील बिपीन रावत आणि आई मधुलिका रावत यांच्या अस्थी घेऊन हरिद्वारला पोहोचल्या होत्या. तेथे गंगा नदीत विसर्जन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 2 =

Close