August 19, 2022

राम मंदिराबाबत भाष्य केल्यामुळे मुंबईत भाजप-शिवसेनेत तुफान हाणामारी

Read Time:2 Minute, 16 Second

अयोध्येतील रामजन्मभूमि जमिन खरेदी प्रकरणावरुन संजय राऊत यांनी भाष्य केले होते. या जमिन खरेदी प्रकरणांस अनेकांनी भ्रष्टाचारसुद्धा म्हटले. शिवसेनेच्या या वक्तव्यांच्या निषवधार्थच मुंबईतील शिवसेना भवनावर भाजप युवा मोर्चाकडून निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चादरम्याम दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि हा वाद झाले असल्याचे कळते.

अयोध्येतील रामजन्मभूमि ट्रस्टच्यावतीने करण्यात आलेल्या जमिन खरेदी व्यवहारांस विरोधकांनी भ्रष्टाचार संबोधले होते. यावरुन देशात चांगलाच वाद रंगला होत. शिवसेना खा. संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि रामजन्मभूमि ट्रस्टने यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती.
तसेच भाजपवर टीकासुद्धा केली होती.

Mumbai: Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) workers protested outside Shiv Sena Bhavan, in Dadar, today over allegations of land scam regarding Ayodhya Ram Temple construction. A scuffle broke out b/w Shiv Sena & BJYM workers during protest.

At least 40 BJYM workers detained. pic.twitter.com/2vju6sUaL6
— ANI (@ANI) June 16, 2021

शिवसेनेच्या या भूमिकेविरोधात भाजप युवा मोर्चाने मुंबईतील शिवसेना भवनासमोर अांदोलनास सुरुवात केली. भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना भवनासमोर बघताच शिवसेना कार्यकर्तेसुद्धा त्याठिकाणी मोठ्यासंख्येने दाखल झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली.

दरम्यान मुंबई पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten + 16 =

Close