January 22, 2022

रामदेव, योगी आदित्यनाथ आता अभ्यासक्रमात ???

Read Time:1 Minute, 54 Second

लखनौ : ऍलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे म्हणणा-या बाबा रामदेव यांना आता योगातील तत्वज्ञ मानून त्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, तसेच योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा देखील आता अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापिठात आता विद्यार्थी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रामदेब बाबा यांच्या विषयी अभ्यास करणार आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांव्यतिरिक्त बशीर बद्र, कुवर बैचेन, जग्गी वासुदेव यांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. नविन अभ्यासक्रमात योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या हठयोग या पुस्तकाबद्दल शिकवण्यात येणार आहे.

या पुस्तकात योगी आदित्यनाय यांनी हठयोगाविषयी माहिती दिली आहे. योगींच्या पुस्तकाचे प्रकाशन गोरखनाथ ट्रस्टने केलं आहे. योगी यांचे विचार विद्यार्थ्यांना वेगळा रस्ता दाखवतील, असे अभ्यास मंडळाचे म्हणणे आहे. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनण्याची संधी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × five =

Close