रामदेव बाबांची सर्वोच्च धाव

Read Time:1 Minute, 59 Second

नवी दिल्ली : ऍलोपॅथी औषधांसंबंधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने योगगुरु बाबा रामदेव अडचणीत सापडले आहेत. बाबा रामदेव यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून त्यांच्याविरोधात अनेक राज्यांत दाखल करण्यात आलेले एफआयआर यांना स्थगिती देण्याची विनंती त्यांनी केली आहे़

रामदेव यांनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अ‍ॅलोपॅथी औषधी प्रभावी नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. असोसिएशनकडून विविध राज्यात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या याचिकेत म्हटले की, मेडिकल असोसिएशनने पाटणा आणि रायपूरमध्ये दाखल केल्या एफआयआरवरील कारवाईला स्थगिती द्यावी आणि या सर्व एफआयआर दिल्लीत ट्रान्सफर कराव्यात.

ते वक्तव्य चांगलेच भोवले
बाबा रामदेव यांनी केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवताना दिसत आहे. केंद्र सरकारनेही बाबा रामदेव यांना या मुद्द्यावरुन सुनावले होते़ कोरोना काळात डॉक्टर दिवसरात्र आपली सेवा देत आहे. अशावेळी बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन आरोग्य कर्मचा-यांचे धैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करू नये, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 14 =