रामतिर्थमध्ये ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅड कुऱ्हाडीने फोडले


नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ गावातील एका मतदान केंद्रावर एका युवकाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅड तोडून टाकले आहे. पोलीसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
आज नांदेड जिल्ह्यात लोकसभा मतदान सुरू असतांना दुपारी 12 वाजेदरम्यान रामतिर्थ या गावातील मतदान केंद्रावर भैय्यासाहेब एडके (35-40) हा मतदार आला आणि मतदानाची प्रक्रिया पुर्ण करून ईव्हीएम मशीनवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी गेला असता तेथे झालेल्या आवाजाने मतदान केंद्रातील प्रमुख व इतर कर्मचारी गोंधळले. त्या ठिकाणी हजर असलेल्या पोलीस अंमलदारांनी तो व्यक्ती भैय्यासाहेब एडके याला ताब्यात घेतले. त्याने आपल्या शर्टमध्ये छोटी कुऱ्हाड लपवून आणली होती आणि मतदान कक्षात असलेल्या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅडची तोडफोड केली. या संदर्भाने निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार तोडलेली ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅड यांचे कंट्रोल युनिट पुर्णपणे सुरक्षित आहेत. त्या ठिकाणी दुसरे ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅड लावून मतदान सुरळीत सुरू आहे. तुटलेल्या मशीन ताब्यात ठेवण्यात आल्या आहेत.

रामतिर्थ येथील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची वस्तुस्थिती दर्शविणारी चित्रफित. 


Post Views: 670


Share this article:
Previous Post: अनेक प्रयत्न करून सुध्दा मतदानाचा टक्का वाढलाच नाही; उदासिनतेमुळे लोकशाहीची वाट लागली

April 26, 2024 - In Uncategorized

Next Post: जिल्ह्यात तीन ठिकाणी 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या तीन चोऱ्या

April 26, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.