August 19, 2022

राणा दाम्पत्याला मनपाची नोटीस

Read Time:1 Minute, 36 Second

मुंबईतील घराचे अवैध बांधकाम भोवणार

मुंबई : राणा दाम्पत्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पालिकेकडून नवनीत राणा यांच्या घराला पुन्हा नोटीस देण्यात आली आहे. घराचे अवैध बांधकाम का तोडू नये, असा सवाल राणा दाम्पत्याला पालिकेने केला आहे.

खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. याच वाढीव बांधकामावर मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेकडून राणा दांपत्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. पुढच्या सात दिवसांत नोटिसीचे उत्तर द्या, असे मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

महापालिका पथकाच्या तपासणीत एकूण राणा दांपत्याच्या घरी १० ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळले आहे. नियमांचे उल्लंघन का केले, मंजूर आराखड्याशिवाय अधिकचे बांधकाम करताना परवानगी घेतली का याची समाधानकारक उत्तरे येत्या सात दिवसांत येणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × 1 =

Close