January 19, 2022

राज ठाकरे आणि नारायण राणेंना षडयंत्र करुन शिवसेनेतून बाहेर काढलं” नितेश राणेंचा आरोप

Read Time:2 Minute, 2 Second

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरत असतो. शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंनी यंदाच्या दसरा मेळाव्यात भाजपावर आपले बाण सोडले. मात्र भाजपनेसुद्धा आता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून ऊद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जाते आहे.

यादरम्यान आ.नितेश राणेंनी या सर्व प्रकरणांस वेगळेच वळण दिले आहे. राज ठाकरे आणि नारायण राणेंना षडयंत्र करुन शिवसेनेतून बाहेर काढण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. राजसाहेब आणि राणेसाहेब यांना षडयंत्र करुन शिवसेनेतून जाणिवपूर्वक बाहेर काढण्यात आले असल्याचे नितेश राणे म्हणालेत. राणेंच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ ऊडाली आहे.

बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं हे शंभर टक्के खरं आहे. आज जर बाळासाहेब असते आणि कालच्या दसरा मेळाव्यातील भाषण त्यांनी ऐकले असते तर सर्वात पहिले त्यांनी ऊद्धव ठाकरेंना गेटआऊट म्हटले असते असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

शिवसेनेतील रावते साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आपणांसारख्या निष्ठावाणांना माझे आवाहन आहे. मी आपणांपेक्षा लहाण आहे. परंतू तरिसुद्धा मी सांगू ईच्छितो आपण कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. मुख्यमंत्री आता केवळ आदित्य ठाकरे आणि मग तेजस ठाकरेच होतील असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + 13 =

Close