January 19, 2022

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

Read Time:1 Minute, 59 Second

परळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळीमधील न्यायालयाने गुरूवार दि. ६ जानेवारी रोजी अटक वॉरंट जारी केले आहे. येथील प्रथम वर्ग परळी वैजनाथ दिवाणी न्यायालयाने (क. स्तर) हे वॉरंट जारी केले आहे. जामीन करून देखील सतत तारखेला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

केस क्रमांक आर. सी. सी. १४०००३८/२००९ प्रकरणी परळी वैजनाथ न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीमध्ये वारंवार जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे न्यायलयासमोर हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. न्यायालयामध्ये या प्रकरणी महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज ठाकरे असा युक्तीवाद सुरू आहे. आरोपी हा सतत गैरहजर असल्याने आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येत आहे.

पुढील सुनावणीला त्यांना न्यायालयासमोर हजर करावे असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सन २००८ साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळी येथे परिवहन मंडळाच्या बसेस वर दगडफेक केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − eight =

Close