राज्यात ५० हजार नवे बाधित

राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रोज मोठ्या संख्येने नव्या रुग्णांची भर पडत असून, शनिवारी तब्बल ४९ हजार ४४७ म्हणजेच ५० हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले, तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे ही आकडेवारी राज्याची चिंता वाढविणारी आहे.

राज्यात दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमालीचा वाढत असून आता हा आकडा ५० हजारांच्या आसपास सरकला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांचे निदान झाले. काल ही संख्या ४७ हजार ८२७ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ १ हजार ६२० ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. या बरोबरच गेल्या २४ तासांत एकूण ३७ हजार ८२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २४ हजार १२६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ वर जाऊन पोहोचली आहे. आज राज्यात एकूण २७७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या २०२ इतकी होती.

मुंबईत ९ हजार रुग्णांची भर
कोरोना संक्रमणाने पुन्हा डोके वर काढल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. आज मुंबईत ९ हजार ०९० नवे रुग्ण सापडले आहेत. मुंबईत या अगोदर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर मुंबई पालिकेसह आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्राने तो नियंत्रणात आणला होता. मात्र, पुन्हा आता कोरोनाचा फैलाव वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + 14 =

vip porn full hard cum old indain sex hot