राज्यात ४३ हजार १८३ नवे रुग्ण

Read Time:2 Minute, 10 Second

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. बुधवारी हा आकडा ३९ हजार ५४४ इतका होता. त्यामुळे एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जवळपास चार हजारांनी वाढला. तसेच मागील २४ तासांत ३२ हजार ६४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात एकूण २४,३३,३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.२० टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मृतांचा आकडा वाढला
गुरुवारी राज्यात कोरोनामुळे २४९ जणांचा मृत्यू झाला. मागील काही काळातील हा सर्वात मोठा आकडा आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता कोरोनाचा धोका वाढत असल्याचे यला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच मुंबईतही निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ८ हजार ६४६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × four =