January 22, 2022

राज्यात ३९ हजारांवर नवे रुग्ण; २२७ बाधितांचा मृत्यू

Read Time:3 Minute, 9 Second

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले असून गेल्या २४ तासांत ३९ हजार ५४४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, तर, २२७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मंगळवारी २७ हजार ९१८ रुग्णांचे निदान झाल्यानंतर राज्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर कोरोना मृतांचा आकडाही आज वाढला आहे. नवीन बाधित, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

राज्यात आज कोरोनाने आणखी २२७ रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा ५४ हजार ६४९ इतका झाला आहे, तर राज्यातील मृत्यूदर १.९४ इतका आहे. राज्यात सध्या ३ लाख ५६ हजार २४३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असून राज्यातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९७,९२,१४३ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी २८,१२,९८० नमनु पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या २४ तासांत एकूण २३ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत एकूण २४ लाख ७२७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ८५.३४ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत आज ५ हजार ३९४ नवे रुग्ण
आज मुंबईत ५ हजार ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५१ हजार ४११ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आज ३ हजार १३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.[woo_product_slider id=”480″]

कोरोना चाचण्यांचे दर कमी
दरम्यान, राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणा-या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणा-या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दरदेखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट १५० रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णयदेखील जाहीर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × three =

Close