राज्यात मध्यवधी निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य!

Read Time:1 Minute, 39 Second


मुंबई | राज्यात मध्यवधी निवडणुकांबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्या कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

आज लहान मुलेही ईडीबाबत गमतीने बोलतात. 50 खोक्यांचीही सर्वत्र चर्चा होते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. यामुळे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचं नाव कमी होत असून फार मोठी कुचेष्टा होत आहे. त्यामुळे आम्हाला अस्वस्थ वाटतं, वेदना होतात, असं ते म्हणालेत.

कुणी बंदूक काढतोय, कुणी एक थप्पड मारलीतर चार थप्पड मारा म्हणतोय, कुणी तुम्हालाही 50 खोकी पाहिजे का म्हणतोय.. ही विधाने ही आपल्या पुरोगामी विचारांच्या राज्याला शोभणारी नाहीत, असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या महाराष्ट्रातील राजकारण अशोभनीय बनलं आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीये.

थोडक्यात बातम्या- 

“ते पेंग्विन म्हणतात, याचा मला अभिमान आहे”

मोठी बातमी! छगन भुजबळ पुन्हा एकदा जेलमध्ये जाण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =