
राज्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
मुंबई : गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणा-या बाधितांच्या संख्येसोबतच राज्यात मृतांचा आकडा देखील वाढताच राहिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये काहीसे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात ४२,५८२ नवे कोरोनाबाधित तर ५४,५३५ डिस्चार्ज नोंदवण्यात आले होते. शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून घट झाल्याचे दिसून आले.
आजच्या आकडेवारीनुसार राज्यात ३९ हजार ९२३ नवे करोनाबाधित आढळले असून ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्य हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर गेला आहे.
शुक्रवारच्या नव्या आकडेवारीनंतर राज्यात आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ इतका झाला आहे, तर त्यातल्या ४७ लाख ७ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यापैकी सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
More Stories
कॉमेडियन राजू श्रीवास्तवचा ब्रेन डेड
नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा अतिशय चिंताजनक झाल्याची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी...
आता संरपचाची निवड जनतेतूनच ; विधानसभेत विधेयक मंजूर
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. आता राज्यात सरपंचाची निवड ही जनतेतूनच...
‘लाल सिंग चड्ढा’च्या वादादरम्यान आमिर खानने घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’या चित्रपटावरुन सध्या मोठा वाद उफाळला आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट खास चाललेला...
राज्याच्या विविध भागात ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’; नागरिकांचा चांगला प्रतिसाद
मुंबई : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक ११वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले....
आकाशवाणीचे जेष्ठ निवेदक गौतम पठ्ठेबहादूर यांचे निधन
12 वाजता होणार अंत्यसंस्कार नांदेड : विजयनगर येथील रहिवाशी तथा आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रासंगिक निवेदक गौतम पठ्ठेबहादूर यांचे आज १५...
औरंगाबादेत पोलिस-दरोडेखोर फिल्मीस्टाईल थरार
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील राहटगाव येथे काही दरोडेखोरांनी दगडफेक करून ट्रक चालकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी त्या...