राज्यात दिवसभरात संक्षिप्त | 21 June

Read Time:7 Minute, 36 Second

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचे हत्यार उपसल्यानंतर राज्यात मंगळवारी राजकीय घडामोडींना वेग आला आणि शिवसेनेत बैठकांचे सत्र सुरू झाले. दिवसभर हे सत्र सुरूच होते.
-सकाळी ७ वा. : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती.
-७.१५ वा. : शिंदेंच्या नाराजीची कुणकुण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली.

-८.०० : नॉटरिचेबल एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याची माहिती. फोन केला असता ते नॉटरिचेलबल लागत होते.
-९.०० : शिंदे पक्षाच्या २५ पेक्षा जास्त आमदारांच्या गटासह सुरतमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती. सुरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये रात्री उशिरा आमदारांसह रात्री उशिरा प्रवेश केल्याचा व्हीडीओ समोर आला.

९.२० वा. : शिंदेंसह सेनेचे जवळपास २५ आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती. त्यात बुलढाण्यातील मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा समावेश असल्याची माहिती.
१०.०० वा : शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अनेक शिवसेना आमदारांना फोन करून नाराजी दूर करण्यासाठी हालचाली केल्या.

१०.३० : २५ नॉटरिचेबल आमदारांपैकी मराठवाड्याचे ६, कोकणातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील ४, विदर्भातील २ आमदारांचा समावेश असल्याची माहिती.
११.०० : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत पोहोचले. फडणवीस यांच्या या दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण.
११.४५ : खा. संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द. मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी दौरा, भुजबळ यांचा नियोजित नाशिक दौरा रद्द. कोकणातील शिवसेना आमदार मुंबईत पोहोचले.

१२.०० : राज्यातील राजकीय नाट्याबाबत शरद पवार… जयंत पाटील चर्चा. दिल्लीतून शरद पवार यांची जयंत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा.
१२.४० : काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा घरोबा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अमान्य असल्याची माहिती समोर.
१.०० : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात चर्चा. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेही दिल्लीला रवाना
१.१५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर, रवी फाटक सुरतकडे रवाना.
१.३० : वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक
१.३० : राष्ट्रवादीचे नेते भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला. मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनात बैठक

१.४० : काँग्रेस मंत्री आणि आमदारांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना.
१.४५ : शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेची खलबतं.. वर्षा बंगल्यावर सेनेचे ३३ नेते दाखल
२.०० : कुणाला मुख्यमंत्री करायचा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. तसेच सरकार पडले तर विरोधी बाकावरही बसू शकतो असेही पवारांनी म्हटले.
२.०० : शिवसेनेची वर्षावर सुरू असलेली बैठक संपली. शिवसेनेच्या ५५ पैकी १८ विधानसभा आमदारांची बैठकीला उपस्थिती
२.१५ : भूपेंद्र यादव, मंगलप्रभात लोढांची ऑपरेशनसाठी निवड. सुरतमधील फार्महाऊसची भाजप नेत्यांकडून बुकिंग…

२.४५ : शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक असल्याचे खा. संजय राऊत यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे गैरसमज झाले असतील तर ते दूर करता येतील, असे सांगितले.

-३.०० : शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसैनिक आक्रमक. सेना भवनाबाहेर शिवसैनिक जमायला सुरुवात
-३.१५ : गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटलांच्या भेटीला भागवत कराड
-३.४५ -मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सुरतमध्ये पोहोचले. शिंदेंच्या जुन्या सहका-यांना ताटकळत ठेवल्याचा आरोप

-३.५० : शिंदेंचा कोणताही प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार नाही. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत भूमिका. शिंदेंचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न
-४.२९ : एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी. नवीन गटनेता म्हणून अजय चौधरी यांची नेमणूक
४.३९ : शिवसेनेचे नार्वेकर आणि पाठक सुरतच्या मेरेडियन हॉटेलमध्ये पोहोचले
४.४५ : १० मिनिटांच्या खोळंब्यानंतर शिवसेना नेत्यांचा मेरिडियन हॉटेलमध्ये प्रवेश
-५.३० : एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांच्यातील बैठक संपली
-६.३० : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद, शिवसेनेने भाजपसोबत जाण्यातच हित असल्याचा आग्रह.
६.४५ : शिंदेंसोबत मुख्यमंत्र्यांचाही संवाद. २४ तासांत वाईट झालो का, भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असा प्रस्ताव

७.४५ वा : महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक. राजकीय संकटावर मंथन.
८.३० वा. : शिवसेना नेत्यांची पुन्हा बैठक. एकनाथ शिंदे लवकरच आपल्यासोबत असतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
८.५० वा : कॉंग्रेस नेत्यांची राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 2 =