August 19, 2022

राज्यात तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ

Read Time:1 Minute, 9 Second

पुणे : महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पहाटे गारठा जाणवत असला तरी बहुतांशी ठिकाणी तापमानात वाढ होत आहे.

पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात ३ ते ४ अंशाची वाढ नोंदली आहे. आज पुण्यात पहिल्यांदाच किमान तापमानाचा पारा २० अंशावर गेला आहे. मागील अनेक दिवसांपासून पुण्यातील किमान तापमान २० अंशाच्या खालीच राहिले होते.यासोबतच राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमानाचा पारा ३३ अंशाच्या वर नोंदला गेला आहे. येत्या काही दिवसांत आणखी वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × two =

Close