राज्यात ओमिक्रॉनचे आणखी ४ रुग्ण

Read Time:2 Minute, 3 Second

उस्मानाबादमध्ये दोघांना संसर्ग

उस्मानाबाद/बुलडाणा : राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, आज ४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी २ रुग्ण उस्मानाबाद आणि मुंबई आणि बुलडाण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ३२ झाली आहे.
उस्मानाबादेत सापडलेले दोन रुग्ण संयुक्त अरब अमिरात येथून उस्मानाबादच्या बावी येथे आले होते. त्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली. त्याचा बुधवारी निकाल समोर आला. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्यासोबत आणखी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे, गावात चिंता वाढली आहे. यासोबत बुलडाण्यात एकाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तसेच मुंबईत आणखी एक जण सापडला आहे. त्यामुळे आज आणखी ४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३२ झाली असून, यामध्ये मुंबईत १३, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुण्यात २, उस्मानाबादमध्ये २, कल्याण डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई विरार आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. यापैकी २५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 + 13 =