May 19, 2022

राज्यात आज २२ एप्रिलपासून कडक निर्बंध

Read Time:4 Minute, 0 Second

राज्यात संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा गत दोन दिवसांपासून होत होती़ दरम्यान बुधवारी रात्री ८ वाजता राज्याचे मुख्यमंत्री फेसबुल लाईव्हव्दारे संपूर्ण लॉकडाऊनची घोषणाही करणार होते; मात्र नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी होणा-या घोषणेचे लाईव्ह रद्द केले़ दरम्यान, राज्यात २२ एप्रिल ते दि़ १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत ब्रेक द चैन मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासंदर्भातील नवी नियमावली राज्य सरकारने जारी केली आहे़

राज्यात आता १० दिवसांकरीता ब्रेक द चैन मोहिमेंतर्गत नवी नियमावली जारी करण्यात आली असून, नव्या नियमांचे कठोर पालन होण्याकरीता काही निर्बंधात नियम मोडणा-यांना आता ५० हजारांचा दंड भरावा लागणार आहे़ राज्यात पुन्हा संपूणृ लॉकडाऊनची घोषणा २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती दिली आहे़ दरम्यान, राज्यात काल जारी केलेल्या सकाळी ७ ते ११ वाजता दरम्यानचे सर्व निर्बंध जैसे थे, राहणार आहेत़

काय आहेत नवे नियम
– सर्व सरकारी कार्यालयात केवळ १५ टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचा-यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
– लग्नकार्यासाठी फक्त २५ लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये २ तासांच्या आत लग्नकार्य उरकावे लागणार. या नियमांचे उल्लघन केल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
– जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर
– खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचे उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
– लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. ५० टक्के लोकांना उभे राहून प्रवास करता येणाऱ
– सार्वजनिक वाहतूकही सर्वसामान्यांसाठी बंद़ खासगी बस सेवांना केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच
– आंतरजिल्हा वाहतुकीसाठीही नियमावली घालून देण्यात आली आहे. सरकारी वाहनांमधून प्रवास करणा-यांना ओळखपत्र पाहून पास जारी करण्यात यावा. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचा-यांनाही संबंधित खात्याकडून पास जारी करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली असून बसमध्येही ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी नसावेत. दूरच्या प्रवासावरुन येणा-या नागरिकांना १४ दिवसांचे होम क्वारंटाइन राहावे लागणार.

Leave a Reply

Your email address will not be published.

five − 2 =

Close