“राज्यातील राजकारणात चमत्कार होऊ शकतो” राधाकृष्ण वीखे पाटलांचे सुचक वक्तव्य

Read Time:2 Minute, 2 Second

भविष्यात एकत्र आलोत तर भावी सहकारी असे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे बघत म्हणाले. आणि राज्यातील राजकारणात खळबळ ऊडवून दिली आहे. यानंतर भाजप आणि महाविकासआघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया ऊमटत आहे.

यादरम्यानच महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी अशी ओळख असणारे राधाकृष्ण विखे पाटलांनीसुद्धा सुचक वक्तव्य केले आहे. राज्यातील राजकारणात चमत्कार होऊ शकतो असे विखे पाटील म्हणाले आहेत. आता विखे पाटलांच्या या विधानावर पुन्हा राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क मांडले जात आहेत.

अहमदनगरमध्ये एका महाविद्यालयाच्या विस्तारीय ईमारतीचे ऊद्घाटन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राजकारणात कुणि कुणाचा कायमचा शत्रु नसतो. त्यामुळे येणार्‍या काळात चित्र बदलले तर त्यात काही नवल नाही असे विखे पाटील म्हणाले आहेत.

राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. महाविकासआघाडीतीप तीनही पक्षांना कुठलाचा आधार नाहीये. शिवसेना-भाजप मात्र सत्तेत नसतांनासुद्धा २५ वर्षे सोबत राहिली आहेत. शिवाय हिंदुत्व या विषयावर दोन्ही पक्षांमध्ये ममत्व आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती झाली तर त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नसल्याचे विखे पाटलांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 − nine =