August 19, 2022

राज्याचा आज अर्थसंकल्प

Read Time:2 Minute, 5 Second

मुंबई : राज्याचा सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर होणार आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने अर्थमंत्री कोणत्या नव्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार शुक्रवारी आपला तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. राज्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जनजीवन व अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा कल आता कल्याणकारी योजनांकडे असून अर्थसंकल्पात लोकोपयोगी योजनांचा समावेश असण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई विधान परिषदेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थ व नियोजन खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने मतदारसंघातील विकास कामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची कॉंग्रेस आणि शिवसेना आमदारांची तक्रार आहे. यासाठी परवा त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. कॉंग्रेस मंत्र्यांचीही विभागाला पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली होती. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे शिवसेना आणि कॉंग्रेसच्या आमदारांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × five =

Close