August 19, 2022

राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

Read Time:2 Minute, 42 Second

अहमदपूर : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आषाढी एकादशीचे औचित्य साधून आँनलाईन राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे निकाल गोखले हायस्कूल बोरीवली येथिल कलाशिक्षीका सौ.शमिका बांदेकर यांच्या हस्ते दि.१४ जुलै रोजी यूटूब ंिलंकद्वारे आँनलाईन निकाल घोषित करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सृजन संस्थेमार्फत वर्षभरात ७५ उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती महादेव खळुरे यांनी दिली. राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेतील दोन्ही गटाचा आँनलाईन निकाल घोषित करण्यात आला. लहान गटातून प्रथम-चैतन्य चंद्रकांत कोरे, द्वितीय-वेदांश धनंजय काष्टे,स्वरित राजेश दाभाडे, तृतीय-उत्कर्ष नाना इंगोले,अनन्या गौरक्षनाथ कोकणे उत्तेजनार्थ -अर्णव महेश पतंगे तर मोठा गटातून प्रथम-संपदा रघुनाथ रंगभाळ, द्वितीय-भक्ती हरीश घुगे, तृतीय-शरयू दुर्गेश आळणे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा निकाल यू-ट्यूब चँनेलच्या माध्यमातून आँनलाईन घोषित करण्यात आला. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवंत विद्यार्थ्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना आँनलाईन ई-सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेसाठी किरण खमितकर, मल्लपा खळुरे, पद्मा कळसकर आदींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × four =

Close